
शांतीनगर प्रभाग क्र 12 बनलाअवैध
देशी दारुचे व मटका जुगाराचे माहेर घर
मध्यवर्ती बँकेजवळ सुरु असलेल्या दारू दुकानाला आशिर्वाद कोणाचा विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर“स्वातंत्र्याच्या संसदेला येवून गेला पुर शासकीय यंत्रणा खाताय धुर अवैध धंदे शहर करतय कुर? शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध देशी दारूचे व मटका धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असून त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सर्वत्र अवैध धंदे हायटेक पद्धतीने सुरु असून राळेगाव शहरात सर्वात जास्त दारू दुकान जोराने सुरु आहे. या सर्व अवैध दारू धंद्यांवर संबंधित विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने मात्र दूर्लक्ष होतांना दिसून येत आहे. पोलीस स्टेशन राळेगाव कडून कोणतीही कडक कारवाही होताना दिसत नाही हे मात्र विशेष..
पोलीस ठाणे हद्दीत सरासरी अनेक जागी अवैध दारु जोरदार सुरु आहे. याकडे राळेगाव पोलीस निरीक्षक लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरात सुरु असलेल्या खुलेआम दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र संबंधित पोलीस स्टेशनं राळेगाव डोळे बंद करून आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अवैध दारु विक्रत्याचा आत्मविश्वास वाढला आहे. यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. राळेगाव शहर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे दारू, हे ठिकठिकाणी खुलेआम दिसत आहे पोलीस प्रशासनासमोर खुलेआम अवैध दारू सुरू आहे. तेव्हा पोलीस प्रशासन कारवाई करणार का? की खुलेआम अवैध दारु विक्री ही आर्थिक हितसंबंधातून कोणाच्या आशीर्वादाने सुरूच राहणार याच्यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






