
संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि. प उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहांडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला वर्ग पहिली ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता हे मात्र विशेष.शाळेतील अनेक विद्यार्थिनीनी राधेची अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती. तर अनेक विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या भूमिका पार पाडल्या. यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत वर्ग पहिली ते आठवपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर अतिशय अप्रतिम असे नृत्य सादर केले. या कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते.
यानंतर शाळेच्या मैदानात दहीहांडीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पान फुलांनी सजवलेली सुबक दहीहांडी उंचीवर टांगली. यानंतर विद्यार्थ्यांनी थरावर थर तयार करून दहीहांडी फोडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतर्फे गोपालकाला तयार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना काल्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने काल्याचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहांडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थपन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर , उपाध्यक्ष दिक्षाताई मुन, उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट,तसेच शाळेतील शिक्षकवृंद रत्नमाला धुर्वे, रीना चौधरी, संदीप टुले, स्वयंसेवक योगेश घोडे व मदतनीस विजय मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले. व तसेच या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यगण व गावातील पालक युवा वर्ग व नागरिक उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






