
• अत्याधुनिक स्किल इंडिया सेंटर (एसआयसीज) महाराष्ट्राच्या आदिवासी भागात लाँच
• तरुणांचा क्षमता विकास करणे व त्यांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणार
• हे लाँच भारतातील कौशल्य विकास क्षेत्र क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या कौशल्यात मोठे रुपांतर होण्यासाठी तसेच शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.
नंदूरबार, २९ ऑगस्ट २०२४ – नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एनएसडीसी) कौशल्य विकास आणि औद्योजकता मंत्रालयाअंतर्गत (एमएसईडी) भारताच्या तरुणांना सक्षम करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी नंदूरबार, महाराष्ट्र येथे पहिले अत्याधुनिक स्किल इंडिया सेंटर (एसआयसी) लाँच केले आहे. नंदूरबारमधील एसआयसी ग्रामीण आणि दुर्गम भागात सुरू करण्यात आलेले अशाप्रकारचे पहिले कौशल्य विकास सेंटर आहे. हा धोरणात्मक विस्तार सरकारच्या विकसित भारत २०४७ साठी तरुणांना सक्षम करण्याच्या सरकारच्या धोरणाशी सुसंगत असून त्याद्वारे कुशल कर्मचारी तयार करून वेगाने बदलत्या अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.या केंद्राद्वारे शेती आणि पूरक कामांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यात खाद्यपदार्थ, कच्चा मालावर प्रक्रिया आणि शेतीवन्य क्षेत्र यांचा समावेश आहे. या उपक्रमांबरोबरच २१ व्या शतकाशी सुसंगत विविध प्रकारचे अभ्यासक्रमही स्थानिक समाजासाठी उपलब्ध केले जाणार आहेत व त्यात आयटी/आयटीईएस, डिजिटल कौशल्ये आणि आर्थिक साक्षरतेचा समावेश आहे.
नंदूरबारमधील एसआयसीचे उद्घाटन श्री. दुर्ग दास उइके, माननीय राज्य मंत्री, आदिवासी मंत्रालय, भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, ‘पहिले एसआयसी नंदूरबारमधील आदिवासी भागात सुरू झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. नागरिकांना त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करता येत असेल आणि योग्य ठिकाणी त्याची विक्री करणे शक्य होत असेल, तरच समाज स्थिर आणि स्वतंत्र राहातो. कौशल्ये आत्मसात केल्यानंतर तरुणांना त्यांचा विकास करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. या देसातील ९० टक्के समाज हरित भागात राहातो आणि ही उत्पादने याच परिसरात तयार होत असतात.’
‘आजचे लाँच विकासासाठी आदिवासी समाजाला पाठिंबा देण्याच्या आणि मदत करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. हे लाँच पंतप्रधान मोदी यांच्या भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याच्या उद्दिष्टाशीही सुसंगत आहे. प्रत्येक माणूस कुशल असणे, स्वतंत्र, स्वावलंबी असणे महत्त्वाचे आहे आणि हे कौशल्य केंद्र इथल्या समाजातील लोकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्यासाठी मदत करेल.’

माननीय पाहुणे श्री. राजेश दादा पडवी, माननीय आमदार (शहाडा मतदारसंघ) हे ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. एसआयसीने निमशहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात कौशल्य विकास उपक्रमांना चालना देण्याचे आणि त्यातून तरुणांना विविध उद्योगक्षेत्रांत काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतील याची खात्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे केंद्र विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांसह, त्या त्या उद्योगाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या केंद्रामुळे प्रमाणीकरणास चालना मिळेल तसेच वेगवेगळ्या उद्योगांत कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी रोजगाराच्या संधींना चालना मिळेल.
या केंद्राची स्थापना देशाच्या तरुणाईसाठी अभूतपूर्व संधी असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये शिकता येतील आणि नामांकित कंपन्यांमध्ये करियरच्या संधी शोधता येतील.नंदूरबारच्या आश्वासक, निश्चयी तरुणांमध्ये दमदार क्षमता असून कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांद्वारे त्यांना या क्षमतांचा विकास करता येईल तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील रोजगाराच्या संधींचा लाभ घेता येईल. या वैशिष्ट्यांच्या अमलबजावणीमुळे भारतातील कौशल्य विकास क्षेत्रात क्रांती येईल आणि उपलब्धता वाढेल, व्यक्तीगत शिक्षणाचा अनुभव मिळेल तसेच करियरविषयक मार्गदर्शनामध्ये सुधारणा होईल. यामुळे लर्नर्सना आवश्यक कौशल्ये विकसित करता येतील, उद्योगक्षेत्रातील ट्रेंड्सविषयी अद्ययावत माहिती मिळेल व देशातील कर्मचाऱ्यांचा प्रभावी विकास करता येईल.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






