रॉयली प्लॉटस्थित कॅफेआड सुरू होते ‘दम मारो दम’!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे अँड रेस्टॉरंटमध्ये कॅफेआड चालणाऱ्या हुक्का पार्लरवर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने धाड टाकली. शनिवारी रात्री तेथून हुक्क्याचा ‘दम’ मारणाऱ्या चार तरुणांसह संचालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे अधिकारी व अंमलदार कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रॉयली प्लॉटस्थित साक्षी कॅफे अँड रेस्टॉरंट येथे हुक्का पार्लरमार्फत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे, तेथील दुसऱ्या माळ्यावर धाड टाकली असता साक्षी कॅफे अँड रेस्टॉरंटचा मालक प्रणव प्रमेंद्र शर्मा (२६, रा. रॉयली प्लॉट) हा धूम्रपान व सेवनाकरिता तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व सेवन करण्यास साहाय्य करताना विनापरवाना मिळून आला, तसेच तेथे मोहित सुनीलकुमार फलवाणी (२१, रा. कृष्णानगर), प्रथमेश मनोजराव मसांगे (१८, रा. गाडगेनगर), पीयूष सुनील बसंतवाणी (२१, रा. कृष्णानगर) हे हुक्का पिताना आढळून आले. आरोपी प्रणव शर्मा याच्याकडून २१०० रुपये किमतीचा हुक्का पॉट, पानरस फ्लेवरचे छोटे पाकीट, फ्लेवरचे डबे व सहा मॅजिक कोल पाकिटे, असा ३२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील कारवाईसाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या टीमने ही कारवाई केली.विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी रात्रीदेखील राजहिलनगर येथील एका फ्लॅटमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरचा तेथील स्थानिक लोकांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी तेथून हुक्का साहित्य जप्त केले होते.

शहरातील शाळा, कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, तसेच अमली पदार्थ बाळगणारे, विकणारे, तसेच सेवन करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली जात आहे. युवावर्गाला नशामुक्त करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील असून, त्याबाबत शाळा, कॉलेज व इतर गर्दीच्या ठिकाणी बैठकी व कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने ही कारवाई झाली.

– नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!