बोपलवाडी शिवारात २९ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मोर्शी तालुक्यातील हिवरखेड परिसरातील बोपलवाडी शिवारात २९ वर्षीय विवाहित महिलेने पोल्ट्री फार्मच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.

पोलिस सूत्रांनुसार, पूजा संजू युवनाते असे मृताचे नाव आहे. मध्य प्रदेशातील मांजरी येथील संजू युवनाते त्याची आई जयवंतीबाई व पत्नी पूजा यांच्यासमवेत हिवरखेड येथील एका शेतकऱ्याच्या बोपलवाडी शिवारात असलेल्या शेतात मागील आठ महिन्यांपासून रखवालदार म्हणून कामाला होते. ३१ ऑगस्ट रोजी पती पत्नी शेतातील कामे आटोपून

खोपडीवर गेले. यादरम्यान मित्र संपत परतेती याची प्रकृती ठीक नसल्यामुळे संजू त्याला घेऊन मोर्शी येथील दवाखान्यात आला होता. रात्री ८च्या सुमारास संजू खोपडीवर पोहोचला. त्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेले. रात्री २ च्या सुमारास संजू बाथरूमसाठी उठला असताना त्याला पत्नी पूजा ही पोल्ट्री फार्म येथील अंगलला फाशी घेऊनघेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसली. दोरी कापून तिला खाली काढले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. दि. १ सप्टेंबर रोजी या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चिंचोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पंकज साबळे, पोलिस शिपाई स्वप्नील बायस्कर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा आटोपला. मृत महिलेचे प्रेत मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वभावाने केला घात?संजू युवनाते याने याप्रकरणी मोर्शी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याची पत्नी तापट स्वभावाची होती. क्षुल्लक कारणांवरून भांडण करत होती. पुढील तपास ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चिंचोळे करीत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!