शिवटेकडीवर काळे फुगे उडवून सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी
अमरावती : राज्यातील महायुती सरकारच्या काळात सुरु असलेला अमाप भ्रष्टाचार व महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली अवहेलना याविरोधात आज अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काॅग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आज स्थानिक मालटेकडी परिसरातील शिवपुतळ्यानजीक महायुतीसरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी ऊपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळात सुरु असलेला प्रचंड भ्रष्टाचार व महापुरुषांच्या पुतळ्याच्या अवहेलनाविरुध्द प्रचंड घोषणाबाजी करुन परीसर दणाणून सोडला. यावेळी युती सरकारर्च्या काळ्या कारनाम्याविरोधातील काळे फुगे हवेत सोडण्यात आले व पत्रकेही वाटण्यात आली.

आज झालेल्या या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, शहर अध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमरावती शहर अध्यक्ष रोशन कडू,राकाॅचे प्रदेश ऊपाध्यक्ष गणेश राॅय, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष किशोर बरडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील कीर्तकार, आदींसह राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्वश्री संजय भोंडे, मनोज अर्मळ, बाळासाहेब चर्हाटे, मोहम्मद स ईद, किशोर अब्रूक, आशाताई गोटे, कल्पनाताई वानखेडे, सरलाताई इंगळे, बंडू जिचकार, भूषण यावले, प्रा. सुशील गावंडे, निखिल भोके, अरुण धर्माळे, विनेश आडतिया, विपीन शिंगणे, संदेश कोंडे, अविनाश ठाकरे, बाबुभाई, संगीता देशमुख, सुवर्णा ढवळे, छायाताई कचरे, विशाल गाडगे, वेदांत ऊगले, दर्शन राजुरकर, सुधीर पटेल, अतिशय वरपर्यंत, अमोल सीलबंद, मनुष्य मिश्रा आदींसह शेकडो कार्यकर्ते ऊपस्थितीमध्ये होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






