भुजलाशयीन पाचपहुर, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, व भुजलाशयीन महिला मत्स्य व्यवसायीक सहकारी संस्था मर्यादित, यांच्या गैर प्रकारची चौकशी करण्याची भोई समाज बांधवाची मागणीचे निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर

 

 

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर भुजलाशयीन पाचपहुर,मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, व भुजलाशयीन महिला मत्स्य व्यवसायीक सहकारी संस्था मर्यादित, यांनी आर्थिक गैरप्रकार करुन इतर संचालकांना धमकी देणे, व भोई समाजातील सभासदांना मच्छी व्यवसाय करण्याकरीता, बंधन घालणे इत्यादी प्रकरणी त्वरीत तपास करण्याचे आदेश देण्यात यावे. दोन्ही संस्थेमध्ये एकूण ६८ सभासद आहे. त्यापैकी एका संस्थेचा अध्यक्ष प्रकाश बोलेनवार, तर दुस-या संस्थेची अध्यक्षा सौ. गिता सुरेन्द्र रामगिरवार आहेत. यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या जी आर. प्रमाणे मुळ जन्मजात भोई समाजातील लोकांना सभासद करणे, आणि १० किलो मीटर आतील लोकांना सभासद करणे, जीआर. प्रमाणे बंधनकारक होते. पंरतु भोई समाजातील १० कि.मी. आतील व्यक्तींना सभासद न करता, अध्यक्ष प्रकाश बोलेनवार यांनी जवळील लोकांना,धरणाच्या १० कि.मी. क्षेत्राच्या बाहेरील सभासद केले आहे, असे गैरप्रकार असतांना आणि याची पूर्ण कल्पना, संस्थेचे अधिकारी यांना होती. तरी सुध्दा त्यांनी पदाचा व अधिकाराचा, दुरुपयोग करुन सभासदाची नोंदणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द सुध्दा पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणे, कर्तव्यात कसूर करणे या प्रकरणी, त्यांच्या विरुध्द प्रचलित नियमानुसार, कार्यवाही करावी. नमुद संस्थेचे पदाधिकारी वर्षाला, लक्षावधी रुपयांच्या मासेचे व्यवसाय करीत आहे. त्यातील रक्कमेचा कायदशीर रेकॉर्ड अजिबात नाही. येणार संपुर्ण आर्थिक उत्पादन नमूद संस्थेचे, पदाधिकारी यांनी हडप केले आहे. येणार आर्थिक उत्पादनचा उपभोग, संस्थेचे पदाधिकारी यांनी केला असून, एकूण ६८ सभासद पैकी ५० ते ५५ सभासदांना वर्षातून एकदा, १००० ते १५०० रुपये मानधन म्हणून देतात. त्याचा कुठेच कायदेशीर रेकॉर्ड नाही. कायदेशीरीत्या व्यवसाय बाबत झालेल्या आर्थिक उत्पादनाचा दैनंदिनी रेकॉर्ड,आणि जमाखर्च व संस्थेच्या सभासदांना दिलेले मानधन, हे पुर्णपणे खाते, देणे घेणे आदी स्वरुपाचे रेकॉर्ड, शासकीय नियम आणि अटी प्रमाणे, रेकॉर्ड ठेवणे बंधन कारक आहे. परंतु संस्थेकडे रेकॉर्ड कायदेशीर दृष्ट्या पुर्णपणे ठेवलेला नाही. त्यामुळे संस्थेचा संपुर्ण रेकॉर्ड जप्त करण्यात यावा, व त्याची बारकाईने तपास केले असता, लक्षावधी रुपयाचा घोटाळा उघडकीस येईल. प्रस्तुत धरण हे भोई समाजाच्या बेरोजगारांना रोजगार मिळावा, अणि त्यांच्या जीवन राहणीमान मध्ये प्रगती व्हावी, याकरीता धरण आणि संस्थेची निर्मीती झाली आहे. परंतु त्या धरणाच्या १० कि.मी. कार्यक्षेत्रा मधील, भोई समाजाचे व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेले असता, त्याला दम दिल्या जाते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात यावा, व झालेल्या आर्थिक अपहाराची वसुली संबंधीत दोषी यांच्याकडून, वसुल करुन त्या बाकीच्या सभासदांना देण्यात यावे, व जी आर. मध्ये नमूद केल्यानुसार,धरणाच्या १० कि.मी. च्या आतील नविन भोई समाजाच्या लोकांना, सभासद घेण्यात यावे, व तसेच १० कि.मी. च्या बाहेरील सभासदांना चौकशी करुन त्वरीत त्या लोकांना, संस्थेमधुन बाहेर काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. आणि संस्थेच्या पदाधिकारी जी आर चा उल्लंघन करुन १० कि.मी. अंतराबाहेरील सभासद घेतले, आणि संस्थेचे पदाधिकारी त्यांना सुध्दा सह आरोपी करुन, त्यांच्या विरुध्दात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारची तक्रार प्रफुल वासुदेवजी नांन्ने, सामाजिक कार्यकर्ता ( जिल्हा प्रतिनिधी दैनिक विदर्भ सत्यजीत ) राहणार बोरगांव (कडू), तालुका केळापूर,जिल्हा यवतमाळ यांनी केली असून यावर त्वरित कारवाई करण्या करिता जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ,जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, यवतमाळ,व मा.सहाय्यक निबंधक दुग्ध यवतमाळ यांना निवेदन सादर केले. निवेदन देताना प्रफुल वासुदेवजी नान्ने, प्रफुल अशोक शिवरकार, पुंडलिक विकास नांन्ने,शंकर कीसन शिवरकार, प्रदीप रामकीसन नांन्ने,निलेश रामदास शिवरकार,मनोज वासुदेव नान्ने, सुभाष रामदास शिवरकार, वासुदेव शेकाजी नान्ने, निखिल अशोक शिवरकर उपस्तित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013610
error: Content is protected !!