
गोंदिया : स्वतंत्र काळ ला 77 वर्ष पूर्ण झाली मात्र देशात मानवाच्या गरजा पूर्ण झाल्या नाही. अजून पर्यंत रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, निवारा, आरोग्य पूर्ण होण्यास किती काळ लागतो हे न सुटणारे कोंडे आहे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याने व शासनाची वक्रदृष्टी असल्याने अजून पर्यंत ग्रामीण क्षेत्रात शिक्षणाची पूर्तता झालेली नाही, अशा प्रकारे अर्जुनी मोर तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये वर्ग 4, खोल्या ३ शिक्षक १ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
बोरटोला येथे चार वर्गाला एक शिक्षक काय शिकवणार त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे बोरटोला येथील चार वर्गाला बसण्याची परिपूर्ण व्यवस्था नसल्याने व शाळा इमारतीपैकी एक शाळा खोली अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून ती इमारत १९९०ची शाळा खोली बांधकाम असल्याने ३४ वर्ष झाले इमारतीला भेगा पडलेल्या आहेत वरील कौलांचे सत पावसाने गळतो आहे अशा परिस्थितीत मुलांनी शिक्षण कुठे घ्यावा. असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे शासनाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून येते. चार वर्गाला एक शिक्षक, बसण्याच्या शाळा खोल्या तीन, अशी परिस्थिती तालुक्यासह जिल्ह्यात बऱ्याच गावात पहावयास मिळते.
ग्रामीण क्षेत्रातील शिक्षणाची पूर्तता केव्हा पूर्ण होणार याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे. मोलमजुरी करणाऱ्या गरीबांच्या मुलांना शिक्षणाची सोयी सुविधा शासन केव्हा उपलब्ध करणार ? खाजगी शाळा कडे शासनाचे लक्ष असून खाजगी शाळातील संस्थापक यांचा गोरख धंदा झालेला आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सुविधा कोण देणार? अशा टाहो गरीब पालक फोडत आहेत. भेगा पडलेल्या शाळा खोलीच्या ऐवजी दुसरी शाळा खोली केव्हा तयार होणार याकडे बोरटोला इंजोरी गट ग्रामपंचायतचे सरपंच कृंदा वैद्ये हे शाळा खोली करिता नवीन इमारत मिळावी म्हणून पंचायत समिती अर्जुनी मोर च्या वारंवार चक्कऱा घालत आहे. मात्र त्यांना शाळा खोली अजून प्राप्त झालेली नही.
वर्ग चार शाळा खोली तीन अशा परिस्थितीत शाळा चालवावी लागत आहे . वर्ग चार शिक्षक एक काय शिक्षण देणार अशी ही परिस्थिती गेल्या चार वर्षापासून आहे (शासनकर्त्यांना ) लोकप्रतिनिधी पूर्ण मानधान घेऊन मानासारखा करता येते. नेत्यांनी याकडे लक्ष का देऊ नये असा प्रश्न निर्माण होतो आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






