भाईगिरी, दादागिरी मोडली गुंडांची साखळीही तोडली !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे.

राजापेठ हद्दीत जुलै व ऑगस्टमध्ये घडलेल्या खुनांच्या दोन दाखल गुन्ह्यात मोक्काची कलमवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजापेठमधील संभाव्य टोळीयुद्धाला प्रतिबंध लागला आहे. लागोपाठ दोन तरुणांचे खून झाल्याने वचपा म्हणून कुणाच्या घरावर दगडफेक झाली तर कुण्या आरोपीच्या घरी धुडगूस घातला गेला. मात्र मोक्काअन्वये कलमवाढ करण्यात आल्याने व कुख्याताला स्थानबद्ध केल्याने राजापेठमधील भाईगिरीला ब्रेक बसला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशान्वये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत सहा गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. त्यांना वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले, तर १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले. एमपीडीए केलेल्या सहा गुन्हेगारांवर विविध ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, लुटमार, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी यासह इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या या विघातक कृत्यामुळे त्यांची शहरात दहशत निर्माण झाली होती. त्यांच्या गुन्ह्यांचा आलेख व वाढलेली दादागिरी, गुंडगिरी बघून त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए व अन्य प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे राजापेठमधील सांधिक गुन्हेगारीची साखळी संपुष्टात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सोबतच, राजापेठमधील अल्पवयीनांच्या टोळीवर देखील वॉच ठेवण्याचे, आरोपीच्या परिसरात रात्रकालीन गस्त घालण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

 

काय आहे एमपीडीए?

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार च धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच ‘एमपीडीए’ होय.

सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. ‘एमपीडीए नुसार संबंधित व्यक्तीला थेट एका वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले जाते. तडीपारी, एमपीडीए, मोक्का अशा प्रतिबंधात्मक कारवाईने गुन्हेगारांवर थेट नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याने अशा कारवायांवर भर दिला जात आहे.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013618
error: Content is protected !!