
शिरसगाव कसबा प्रतिनिधी. अचलपूर अंबापेठ येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने रावण दहन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला 150 वर्षाची परंपरा असलेला हा कार्यक्रम सर्वसामान्य भाविकांच्या आकर्षणाचा मानबिंदू ठरला आहे. येथील विक्रमादित्य रमेशचंद्र चुलेट, राम रमेशचंद्र चुलेलेट यांच्या अथक परिश्रमातून हे 150 वर्षाची रावण दहनाची परंपरा अखंडपणे या परिसरामध्ये चालू आहे. अंबापेठ स्थित श्रीराम मंदिरामधून राम लक्ष्मण सीता व हनुमान यांची शोभायात्रा निघून ती जगदंब देवी संस्थानच्या दशहरा मैदान येथे स्थिरावते. याठिकाणी जगदंब देवी संस्थानसह दोन्ही संस्थेच्या अंतर्गत राम आणि रावणाच्या युद्धाचा देखावा रंगतो. इंग्रजीत कुंभकर्ण व रावणाचा युद्धामध्ये अंत हा देखावा मोठ्या आकर्षक पद्धतीने सादर केला जातो . त्या प्रसंगाचा आनंद भाविक मोठ्या प्रमाणावर व्यक्त करून राम विजयाचा जयजयकार करतात.हजारोच्या संख्येने जनमानस उपस्थित असतो. यामधे रावण , कुंभकर्ण व इंद्रजीत यांचा युद्धात अंत होतो , विषेश म्हणजे रावणाच्या पुतळ्याला स्वतः हनुमानजी अग्नी देणारा हा प्रसंग पौराणिकतेवर आधारित असतो, त्यामुळे या रावण दहन कार्यक्रमाच विषेश महत्व आहे. यावर्षी रामची वेशभूषा ओम् दापूरकर लक्षमणाची वेशभूषा सागर तवर संहितेची वेषात सर्वेश चव्हाण तर हनुमान सर्वेश तायडे यांनी साकारली रावणाची वेषात ककरीये इंद्रजीतची वेशभूषा मंगेश ककरीये कुंभकर्णचे वेशभूषा बलराम भुसाठे राक्षसाचे गजानन राऊत अमोल शहाणे यांनी साकारले जगदंब देवी संस्थानचे अध्यक्ष रामाकांतजी शेरकर नाना धमाले नंदनवार यांनी यशस्वीपणे पार पाडले यामध्ये रामलीला कमिटीचे अध्यक्ष विक्रमादित्य चुलेट उपाध्यक्ष उपाध्यक्ष राम चुलेट महाराज सचिव सुरज बोरकर सहसचिव आकाश शहाणे अमोल रंभआड शहाणे ,उंबरकर देऊळकर सागर पाटणकर मोहोळ मनोहर भुसे सर्वेश धोंडे राजू शहाणे आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पडला . या रावणदहन कार्यक्रमाने विजया दशमी खऱ्या अर्थाने संपन्न होत असल्याचा आभास निर्माण होतो. सरमसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गोपाळराव चावळीकर व सर्व कर्मचारी तहसिलदार , नगरपरिषद कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







