
वर्धा:- सेलू तालुक्यातील पळसगाव बाई येथील अत्यंत गरीब परिस्थितीतून संकेत रवींद्र आदमने या खेळाडूने कबड्डी खेळामधून नागपूर विद्यापीठातून प्राविण्य प्राप्त करत राजस्थान टीम मध्ये स्थान मिळवले आहे.
नागपूर विद्यापीठातून राजस्थान कबड्डी चमूत नियुक्ती
संकेत हा मूळचा सेलू तालुक्यातील पळसगाव बाई येथील असून त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण सिंधी रेल्वे येथे झाले दहावी मध्ये त्याने कबड्डी खेळामध्ये वर्धा जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांक वरती प्राविण्य मिळवले होते. सध्या तो देवळी येथे शिक्षण घेत असताना अभ्यासाबरोबरच कबड्डी खेळाला महत्व दिले त्यामुळेच त्याचे नागपूर विद्यापीठातून राजस्थान टीम मध्ये नियुक्ती झाली जिल्ह्यामधून त्याला पहिला क्रमांक प्राविण्य प्राप्त झाली आहे त्याच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण असून वडील शेती करतात त्याने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







