शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर… बडनेरा मधून सुनील खराटे… जाणून घ्या यादी..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

महायुतीच्या तीनही घटकपक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आताच महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ६५ उमेदवारांचा समावेश आहे. तर अकोल्यातून बाळापूर विधानसभा मतदार संघात नितीन देशमुख व अकोला पूर्व मधून गोपाळ दातकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्रातील जनतेच्या नाहीत तर देशभरातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत. अश्या अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. तर याच मतदारसंघात रवी राणा हे युवा स्वाभिमानी पक्षाचे तगडे उमेदवार असल्याने त्यांच्या विरोधात सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्याने आता याच मतदारसंघातील रंगत वाढली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013610
error: Content is protected !!