
महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी नगर परिषद मधील दिवसेंदिवस आश्चर्यकारक बाबी शहरातील नागरीकांना अनुभवयास मिळतात कधी पावसात नालींची सफाई न करणे, दिवसा विद्युत रोषणाई तर रात्रीला अंधार, मच्छरांचा प्रभाव वाढल्यास फवारणी न करणे आणि केल्यास वेळ निघुन गेल्यास, जिथे बांधकामाची आवश्यकता आहे तिथे न करता दुसरी कडे जिथे आजच गरज नसतांना त्या बांधकामाची पूर्तता करणे, कधी निकृष्ट दर्जाचे तर कधी भर पावसात काम करणे, घाणीच्या साम्राज्याचा भला मोठा डोंगर उभा करणे अशा अनेक समस्या असताना अनेक बाबी मध्ये शहरातील नागरीकांना आश्चर्याचा दुःखद धक्का अनुभवला असुन अंजनगाव सुर्जी शहरातील सहारा नगरातील नगर परिषद बांधकाम विभागा मार्फत नाली बांधकामाचे काम चालु असुन बांधकाम करतांना नालीच्या मधोमध चक्क विद्युत खांब घेतल्याने नागरीकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आता हा विद्युत खांब मधात असल्याने नागरिकांच्या घरातील सांडपाणी वाहत कसे जाईल? उलट ते सांडपाणी रस्त्यावर येईल आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल असे स्थानिक रहिवासी यांनी सांगितले आहे.
परंतु नगर परिषद येथे बांधकाम विभाग असुन या सर्व नियोजना करीता बांधकाम अभियंता असताना अश्या चुका का? होतात या वरून नगर परिषद व बांधकाम विभागाचे सर्व कामावर दुर्लक्ष असल्याचे रहिवाशी व नागरीक सांगत आहेत.
तसेच नगर परिषद चे बांधकाम अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







