ट्रॅक्टरची मोटार सायकलला धडक; माजी सैनिकांचा जागीच मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखली/बुलढाणा :  चिखली वरून कोंनड गावाकडे परत जातं असतांना अचानक समोरवरून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार मोटार सायकलला धडक दिली झालेल्या अपघातात माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना मलगी फाटयावर घडली.

चिखली पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार कोनड येथील माजी सैनिक एकनाथ विठोबा पतिहार वय 60 वर्ष हे चिखली येथे काम आटपून घराकडे मोटार सायकल वर जातं असतांना समोर वरून भरधाव वेगाने येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील ट्रॅक्टर चालकाने मोटार सायकलला जोरदार धडक दिली असता मोटार सायकल वरील माजी सैनिक हे गाडी वरून रोडवर पडताच ट्रॅक्टरचे त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती चिखली पोलिसांना मिळताच ठाणेदार सग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बिट जमदार विलास पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचासमक्ष पंचनामा करून ट्रॅक्टर चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

FacebookWhatsappInstagramTelegram
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!