
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) : अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अंजनगाव सुर्जी येथे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस , शिवसेना ( उ.बा.ठा. ) , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामधील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने – सुधाकर भारसाकळे ( अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , बाळासाहेब हिंगणीकर ( माजी सभापती जि.प. अमरावती ) , सुधीर सूर्यवंशी ( अमरावती संपर्कप्रमुख ) , गजानन लवटे ( अधिकृत उमेदवार महाविकास आघाडी दर्यापूर विधानसभा ) , प्रमोद दाळू ( अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी ) , प्रदीप देशमुख ( शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी अंजनगाव सुर्जी ) , राजू आकोटकर ( शहराध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा अंजनगाव सुर्जी ) , प्रदीप येवले ( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अंजनगाव सुर्जी ) तसेच सर्व नागरिक , महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







