मतदानाचा ६५ टक्का कुणाला देणार धक्का

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती: लोकशाहीचा महोत्सव अखेरच्या टप्प्यात आहे. यासाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला उशिरापर्यंत ६७.२४ टक्के मतदान झाल्याची निवडणूक विभागाची माहिती आहे. काही मतदारसंघांमध्ये उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यापूर्वी सन २०१९ मधील निवडणुकीत ६१.०७ टक्के, तर लोकसभा २०१४ मध्ये ६३.५८ टक्के मतदान झाले होते. २३ नोव्हेंबरला मतमोजणी असल्याने पुढील ४८ तास उमेदवारांचे देव पाण्यात असल्याचे चित्र आहे.

तिवसा, धामणगाव, अमरावती मतदारसंघात वेट, तर अन्य पाच मतदारसंघात बहुरंगी लढत असल्याने एकएका मतासाठी संघर्ष अनुभवायला मिळाला. अमरावती, बडनेरा मतदारसंघात राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागला, तर मोर्शीमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. अचलपूर, मेळघाट मतदारसंघात तिहेरी लढत झाली. या सर्व प्रकारांमध्ये मतविभाजन झाल्याने मतदारांचा नेमका कौल कुणाला, है मतमोजणीअंती स्पष्ट होईल.

आठही मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात म्हणजेच सकाळी ९ पर्यंत ६.०६ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी ११ पर्यंत १७.४५ टक्के, तर दुपारी १ पर्यंत ३१.३२ टक्के मतदान झाले. दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. त्यामुळे दुपारी ३ पर्यंत ४५.१३ टक्के मतदान झाले. यामध्ये मेळघाट व अचलपूर मतदारसंघात मतदानाचा ५० टक्का पार झाला होता, तर सर्वात कमी ३९.२७ टक्के मतदान अमरावती मतदारसंघात झाले. सायंकाळी ५ पर्यंत ५८.४८ टक्के मतदान झाले.

अखेरच्या एक तासात म्हणजे सायंकाळी ६ पर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी मिळण्यास उशीर लागणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले, किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013582
error: Content is protected !!