
अकोला : एसटी महामंडळाच्या अकोला विभागीय कार्यालयात एसटी कामगारांच्या अंतर्गत नियुक्त्या, पदोन्नत्यांसाठी कामगारांची अडवणूक करण्यात येत याबाबत सातत्याने तक्रारी होतात. कार्यालयामधील वादग्रस्त आस्थापना पर्यवेक्षक गणेश धनोकार यांचाकडून नियुक्तीबाबत अडवणूकीबाबत तक्रार करण्यात आली होती. एसटी महामंडळांतर्गत तक्रारीची चौकशी होऊन मंगळवार, ३ रोजी महामंडळाच्या सेवेतून निलंबीत करण्याचे आदेश एसटी महामंडळ प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात नियुक्त्या, पदोन्नत्यासाठी कामगारांच्या अडवणुक प्रकरणी दैनिक देशोन्नतीने २२ ऑक्टोंबर रोजी वृत्त प्रकाशित करून एसटी महामंडळ एसटी प्रशासनाने अखेर वादग्रस्त आस्थापना पर्यवेक्षक धनोकारला सेवेतून निलंबत करण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे नागपूर-अमरावती प्रदेश व्यवस्थापक यांच्या स्वाक्षरीने वाहतूक पर्यवेक्षक यांच्या निलंबनाचे आदेश अकोला विभागीय कार्यालयाला मंगळवारीच तातडीने पाठविण्यात आले.
एसटी महामंडळातील आस्थापना पर्यवेक्षक गणेश धनोकार यांचाकडून नियुक्तीबाबत आदेशोन्नती तक्रार होती. प्रादेशिक परिवहन विभागाच्या गाच्या वायुवेग पथकांसाठी इंटरमेट वाहकांकरिता चालकांची नियुक्तीबाबत मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी पत्र काढले होते. त्यामध्ये कमी बेसिकच्या चालकांना नेमणूक द्यावयाची होती. त्याकरिता कामगार परमेश्वर फुकट यांचे बेसीक कमी होते. असे असतानासुध्दा त्यांचे नाव प्रथम यादीतून वगळण्यात आले. श्री फुकट इंम्पॅक्ट यांना परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी नेमणूक देण्याकरिता श्रीमती वैशाली चक्रे यांना ५ मे २०२४ रोजी आस्थापना पर्यवेक्षक यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. आस्थापना पर्यवेक्षक यांनी नेमणुकीच्या बदल्यात मोबदला देण्याची मागणी केल्याचे श्रीमती चक्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
श्रीमती चक्रे यांनी आर्थिक मागणी देण्यात तात्पुरता स्वरुपात होकार भरला. त्यानंतर धनोकार यांनी एसटी चालकाच्या माध्यमातून श्रीमती चक्रे यांच्याशी संपर्क साधून रक्कम देण्याची मागणी केली. या त्रासाला कंटाळून श्रीमती चक्रे यांनी वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारकरुन संभाषणाची रेकॉडींग दिली. त्यानुसार सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी चौकशी करुन मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला होता.
आस्थापना पर्यवेक्षक यापूर्वीही सुध्दा वादग्रस्त ठरले आहेत. मुर्तिजापूर येथील वाहकाचे प्रकरण देखील चांगलेच गाजले होते. एसटी महामंडळाच्या अकोला विभागीय कार्यालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत नियुक्त्या, पदोन्नत्यासाठी काहींकडून अडवणूक करण्यात येत असल्याची बाब या कारवाईनंतर अधोरेखीत झाली आहे.
अकोला विभागीय कार्यालयातील आस्थापना पर्यवेक्षक यांच्याबाबतच्या तक्रारीवर चौकशी होऊन त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.
– श्रीकांत गभणे
प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर- अमरावती प्रदेश एसटी महामंडळ
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






