
गौण खनिज उत्खनन करणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये अंतर्गत वाद
पुसद शहरातील अनधिकृत रेती,मुरूमचे महसूल प्रशासन बंद करणार का? असा प्रश्न निर्माण
पुसद : गेल्या काही दिवसांपासून पुसद मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे तर आजचा तरुण भरकटलेला दिसत आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय बांधकामे सुरू असून याकरिता नागरिकांना व शासकीय विभागांना मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची गरज भासत आहे.
तर सहज व जास्त मुबलक पैसा मिळत असल्यामुळे या व्यवसायामध्ये गुन्हेगारांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे याबद्दल स्पर्धा वाढली आहे. व्यवसायिक या स्पर्धेतून एकमेकांशी वाद मारामाऱ्या या सातत्याने घडत आहेत तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती व मुरमाचे ठिय्ये निर्माण झाल्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत भराधाव वेगाने डुगे ( रेतीचे( छोटे वाहन ) यांच्याकडे कुठलाही महसूल चा अधिकृत परवाना नाही. रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
त्याकडे पोलीस प्रशासनासहस्थानी गुन्हे शाखा व महसूल विभाग गांभीर्याने लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे? 11 डिसेंबर रोजी पुसद तहसील परिसरात कामानिमित्त गेलेले श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सदस्य सचिन मधुकरराव भिताडे यांच्यासोबत वाळू माफिया कडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मधुकर भिताडे हे 11 डिसेंबर च्या दुपारी साडेतीन ते चार वाजता च्या दरम्यान तहसील परिसरात कामानिमित्त उभे असताना वसंत नगर येथील वाळू तस्कर अब्दुल राजिक अब्दुल रऊफ रा. वसंतनगर सचिन मधुकर भिकाडे हे दुचाकी वर बसले असताना त्यांची दुचाकी अडवून आरोपीने कोणतेही कारण नसताना पाठीवर व डोक्यावर आपणा मारून बुक्क्यांनी मारहाण करून अश्लील भाषेत स्वीकार केली. पाच ते सहा दिवसात जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल राजिक यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता च्या कलम 296,115(2),351(2,351(3) अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार उमेश बेसनकर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






