धारदार तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणाऱ्या तीन इसमांवर कारवाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई

पुसद  : खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेंबाळपिंपरी येथे हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तीन व्यक्तींवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसद पथकाची धडाकेबाज कारवाई याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात शासनातर्फे फिर्यादी सुनील पंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खंडाळा पोलीस ठाण्यात अप क्र. 496/ 2024 कलम 4/25 आर्म ॲक्ट आरोपी शेख तोहित शेख शफी वय 22 वर्ष ,सय्यद असिफ सय्यद सलीम वय 20 वर्षे व शेख अमीर खान फारुख वय 25 वर्ष रा सर्व रा. शेंबाळपिंप्री ता पुसद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तलवारीसह ताब्यात घेण्यात आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंबाळपिंपरी येथील ईसापुर कडे जाणाऱ्या कमानीजवळ एक लोखंडी धारदार गंजलेली निमुळते टोक असलेली तलवार ज्याची एकूण लांबी 32 इंच व पात्याची लांबी 25 इंच मध्यभागी रुंदी एक इंच मोठ्या लांबी सात इंच अंदाजे किंमत एक हजार रुपये सदर आरोपी हे 14 डिसेंबरच्या सायंकाळी 5:30 वाजता च्या दरम्यान खंडाळा पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळाली कि, तीन व्यक्ती हे हातात तलवार घेऊन सामाजिक शांतता व सलोखा बिघडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी हैदोस करीत आहेत. प्राप्त माहितीवरून घटनेचे गांभीर्य बघत, पोलिसांनी घटनास्थळ गाठत वरील प्रमाणे तीन आरोपींना जेरबंद केले. व त्यांच्या ताब्यातील तलवार जप्त केली.

सदरची कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ रजनीकांत चुलमुला अति.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद ज्ञानोबा देवकते, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसद पथकाचे API गजानन गजभारे, PSI शरद लोहकरे, HC रमेश राठोड, HC संतोष भोरगे, HC तेजाब रणखांब, PC सुनिल पंडागळे, DPSI रवींद्र श्रीरामे, यांनी पार पाडली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!