
संतोष मोरे/खालापुर :: रायगड जिल्हा परिषद प्राथ. शाळा डोणवत शाळेची क्रीडा स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये केंद्रस्तर : तोंडली नारंगी मध्ये कौतुकास्पद कामगिरी सदर स्पर्धा या दोन दिवस केंद्र शाळा : तोंडली नारंगी या ठिकाणी उत्साहात पार पडल्या.विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास करणे हे शिक्षणाचे मूलभूत ध्येय असून यासाठी मा. शिक्षणाधिकारी श्रीम. पुनिता गुरव मॅडम, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये हा अभिनव उपक्रम यावर्षी क्रीडा प्रकार व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन केंद्रस्तर , बीटस्तर, तालुकास्तर तसेच जिल्हास्तर या प्रकारात घेतल्या जाणार आहेत त्यामध्ये केंद्रस्तरावर रा जि प प्राथ. शाळा : डोणवत शाळेने लहान गटातील इ. 1 ली ते 4 थी स्पर्धा लंगडी , दोर उडी, बेचकीने नेम धरणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सर्वांची मने जिंकली तसेच पथनाट्य व्यसनाधीनता नाटकास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला ,यासाठी शाळा व्यवस्थापन समिती – डोणवत अध्यक्ष सौ. सुजाता सुधीर देशमुख , श्री. महादेव कवडे, सौ. वर्षा लोंढे, श्री. सचिन लोंढे व इतर पालक वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनंदन केले.तसेच नारंगी ग्रामपंचायतचे सरपंच सौ.भारती आरावकर,उपसरपंच श्री.देवेन्द्र देशमुख,खालापुर चे गटशिक्षणधिकारी श्री.कैलास चोरमोले,नारंगी पोलीस पाटील श्री पंकज देशमुख हे देखील विद्यार्थी चे कौतुक व सत्कार करण्यासाठी उपस्थीत होते.

सदर क्रीडा प्रकार व व्यक्तिमत्व विकास या प्रकारास श्री परशुराम तासतोडे ( मुख्याध्यापक ) व श्री अशोक चोरमले शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य व मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे संपूर्ण केंद्रस्तरीय नियोजन मान. श्री. संतोष पाटील साहेब ( केंद्रप्रमुख – तोंडली नारंगी ) यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धा पार पडले केंद्र : तोंडली नारंगी मधील सर्व शिक्षकांनी सदर कार्यक्रमासाठी सहकार्य करून केंद्रस्तरीय क्रीडा प्रकार व व्यक्तिमत्व विकास केंद्रस्तरीय स्पर्धा नियोजनानुसार पार पडण्यासाठी योगदान दिले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






