नारंगी शाळेचा तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार विजय!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संतोष मोरे – खालापुर : खालापूर तालुक्यातील नारंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच आयोजित तालुकास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावत शाळेचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांची झलक दाखवण्याची संधी मिळाली.
नारंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठा गट पारंपारिक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि लगोरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमागे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा पाटील, भागिनाथ पोटे सर, दीपक खाडे सर, नम्रता यादव मॅडम आणि केंद्रप्रमुख संतोष पाटील सर यांचे सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आहे.
खालापूर तालुक्यातील वडगाव येथे आयोजित या स्पर्धेत तीन बीट पातळीवरून निवडलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत वावोशी बीटने सर्वाधिक पारितोषिके मिळवून चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. चोरामले साहेब यांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
नारंगी शाळेच्या विद्यार्थ्यांची ही कामगिरी शालेय शिक्षण क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. शाळेच्या या यशस्वी प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा!

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013563
error: Content is protected !!