अखेर… बेपत्ता ‘निल’ तीन दिवसांनंतर घनदाट जंगलात झाडाखाली ‘या’अवस्थेत आढळला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

तुमसर :- तालुक्यातील चिखला येथील बावन कॉलोनी येथील चार वर्षीय चिमुकला निल चौधरी हा अंगणात खेळत असताना दि.१ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या प्रारंभी दुपारी चार वाजता दरम्यान अचानकपणे बेपत्ता झाला. दरम्यान त्यांच्या आई-वडीलांनी गावात व जंगल परिसरात शोध घेतला असता त्याचा शोध लागलाच नाही. दरम्यान निलच्या मामा अतिश दहिवले यांनी गोबरवाही पोलीसात निल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिस विभाग खळबळून जागा झाला.दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने चिमुकल्या निलचे अपहरण किंवा लगतच्या जंगलात हिंस्त्र वन्यप्राण्यांने  शिकार तर केली नसावी या विषयी शंका कुशंकेला पेव पुटले होते. दरम्यान त्या दिशेने पोलीस व वनविभागने तपासाला गती दिली.

पोलीस व वनविभागाच्या चमूच्या शोधकार्याला यश

गोबरवाही पोलीस व भंडारा येथील पोलीसांची चमू व नाकाडोंगरी वनविभागाच्या  चमूमार्फत जंगल परिसरात दिवस रात्र, शोधमोहीम राबविली. परंतु चार वर्षीय चिमुकला निल चौधरीचा शोध लागला नव्हता. तीन दिवस लोटूनही निलचा शोध लागत नसल्याने चिमुकल्या निलचे आई-वडील चिंतेने ग्रासले होते. दरम्यान सलग दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी सुध्दा वनविभाग व पोलीस विभागाने जंगलात जाणार्‍या रस्त्यावरील फुटेज तपासले व ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने जंगलात गावातील परिसरात सर्च आपरेशन राबविले तरी देखील बेपत्ता निलचा कुठेच ठिकाणा लागला नव्हता. शेवटी तीन दिवसानंतर ४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान नाकाडोंगरी वनविभागाच्या चमुला चार वर्षीय चिमुकला निल चौधरी हा चिखला येथील घनदाट जंगलात एका झाडाखाली भुकेने व्याकूळ असलेल्या अवस्थेत बसून आढळून आल्याने पोलीस व वनविभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान सर्वांना सुखद धक्का बसला.

भुकेने व्याकूळ निल जंगलात सुखरुप मिळून आल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने, पोलीस निरीक्षक निवृत्त गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकला निल ला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी  रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013556
error: Content is protected !!