सोमवारी कृषी कार्यालयाला ताला ठोको..!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

मानोरा:- शासनाच्या कृषी योजनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवत मुख्यालयी न थांबता बाहेरच्या जिल्हयातून कार्यभार सांभाळणाऱ्या कर्मचारी व कार्यरत अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली केलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशीची मागणी करुनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने दि ६ जानेवारी रोजी कृषी कार्यालयास ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना पंचायत समितीच्या सदस्या सौ. छाया राठोड यांनी निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पंचायत समितीच्या सदस्या सौ. छाया राठोड यांनी निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी

मानोरा तालुक्यात नियुक्त कृषी सेवक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी व कार्यरत कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावरून गाडा हाकत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणा पायी तालुक्यात कृषी योजनेचा बट्ट्याबोळ होत आहे. तसेच अनेक शेतकरी कृषी विषयक शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत. मानोरा तालुक्यात कृषी विषयक योजनेची (Scheme on Agriculture) माहिती शेतकऱ्यांना पुरवली जात नसल्याची शेतकऱ्यांना हक्काच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार तालुका कृषी कार्यालयाकडून होत असल्याने सौ छाया राठोड यांनी वारंवार निवेदन, स्मरणपत्र देत मागणी केली होती. आधीच मानोरा तालुका दुष्काळग्रस्त तालुका आहे. येथील बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने शासनाच्या सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर येथील शेतकऱ्यांना अनेक योजनेच्या लाभ देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, गतिमान पाणलोट तसेच जलसंधारण कार्यक्रम, ग्रामीण रोजगार हमी योजना, सेंद्रिय खताचा समतोल व एकात्मिक वापर, पीक संरक्षण योजना, अनुसूचित जाती, जमाती योजना, अनुदानावर शेती अवजारे वाटप अशा अनेक योजना शासन स्तरावर राबविल्या जातात.

कृषी कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येणार..

मात्र, या सर्व योजनेची प्रत्यक्षात योग्य प्रकारे अंमलबजावणीची जबाबदारी ज्या शासकीय प्रतिनिधी निवडलेला कृषी कर्मचारी, हे महिना महिना शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत नसून बाहेरच्या जिल्ह्यातून आपल्या पदाचा कार्यभार पाहतात. या कर्मचाऱ्यावर वरिष्ठांचा कुठलाच नियंत्रण नसल्याने योजनेच्या नावावर शेती शाळा घेऊन प्रशिक्षणाचा निधी अधिकारी व कर्मचारी घशात घालण्याचा प्रकार याआधीही तालुक्यात झाल आहे. प्रत्यक्षात प्रशिक्षणात उपस्थिती नगण्य असताना सुद्धा उपस्थिती अधिकची दाखवून तसा अहवाल वरिष्ठाकंडे सादर करून निधी हडपण्यांचा प्रकार बिनबोबटपणे येथे सुरू असून जे शेतकरी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळ करतात अशा अनेक शेतकऱ्यांना या विभागाचे लाभ मिळत नसल्याने उपरोक्त सर्व बाबीची सर्वकष चौकशी होऊन दोषींवर कारवाई आपल्या स्तरावरून कुठल्याच प्रकारची बाबीची गंभीरतेने दखल घेऊन मानोरा कृषी कार्यालयातील अनागोंदी कारभार तात्काळ थांबविण्यासाठी सदोष चौकशी करून दोषीवर कार्यवाहीसाठी कृषी कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदन वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Facebook
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013559
error: Content is protected !!