
रिसोड:- कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच गाईंची सुटका करण्यात बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना यश मिळाले असुन ही घटना रिसोड ते लोणार आड मार्गावरील लोणी बुद्रुक येथे 4 जानेवारीच्या सकाळी 4:30 वाजता उघडकीस आली.
तालुक्यातील गोधन तष्करीला कधी बसणार लगाम
पोलीस सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार,चितांबाभर येथील बजरंग दलाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर दिनकरराव साखरे,वैभव धोत्रे,शुभम कोकाटे,यांना एका टाटा एस क्रमांक एम.एच. 28 एच.9902 या वाहनातुन कत्तलीसाठी चार गाईं घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ वाहनाचा पाठलाग करून लोणी बुद्रुक येथे वाहनाला पकडले. वाहनाची झाडाझडती घेतली असता वाहनात दोन गाई, दोन वासरू व एक वगार असे पाच जनावरे आढळुन आले. या घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला देताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक रामेश्वर नागरे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले, यावेळी सुमारे 60 गाईची किंमत आणि एक लक्ष रूपये किंमतीचे वाहण जप्त करण्यात आले. तोपर्यंत घटनास्थळी बजरंग दलाचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने जमले होते. जनावराने भरलेले वाहन व आरोपीसह रिसोड पोलीस स्टेशनला आणण्यात आले. यातील आरोपी शेख मुदतशीर शेख जाफर व शेख जाफर शेख मुसा राहणार आझाद नगर लोणार यांना वाहणासह ताब्यात घेतले असुन त्यांच्यावर प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्या अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील जनावरांना रिसोड तालुक्यातील करडा येथील श्रीकृष्ण गोरक्षण धाम येथे सोडण्यात आले.कतलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनासह सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असुन पुढील तपास ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक गीते व रिसोड पोलीस करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रा मध्ये गो मातेला राजमाताचा दर्जा प्राप्त केल्या नंतर तालुक्यातील गोधनाची अवैध रित्या तष्करी थांबता थांबेना या कडे संबंधित प्रशासणाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






