
अमरावती : जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने सावित्री जिजाऊ महोत्सवा अंतर्गत दिनांक 5 जानेवारी 2025 ला धामणी मानोरा जिल्हा वाशिम येथे एक दिवसीय लेखिका संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका डॉ. लीना निकम या राहणार असून संमेलनाचे उद्घाटन जिजाऊ चित्रपटात मा जिजाऊ ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख करणार आहेत. याप्रसंगी अतिथी म्हणून कारंजा मतदार संघाच्या आमदार सईताई डहाके व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे आयोजन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वाशिम जिल्हा शाखे द्वारे करण्यात आले आहे. या संमेलनात 21 व्या शतकातील स्त्रियांचे लेखन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रा. डॉ. पद्मिनी दुरुगकर घोसेकर प्रा. कीर्ती काळमेघ प्रा. सिंम्ररेला देशमुख प्रा. मनाली तायडे ह्या सहभागी होणार आहेत. नागपूरच्या प्रसिद्ध लेखिका प्रा. विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथनात प्रा. संघमित्रा खंडारे, डॉ.अनघा सोनखासकर प्रा. डॉ मंदा नांदुरकर ,प्रा. डॉ. नेहा भटकर आदींचा सहभाग राहणार आहे.
डॉ. शोभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात निर्मलाताई पाटील, प्रभाताई पाटील, कांचन उल्ले, मीनल येवले ,प्रा. भारती खापेकर नसीम जमादार ,मनीषा पाटील ,उमा गवई ,प्रणाली देशमुख, दुर्गा देशमुख मयुरी ठाकरे, वर्षा पतके थोटे ,मीना बोडके, मंगला नागरे ,प्रियंका गिरी ,संजीवनी काळे,दिपाली सुशांत मेहत्रे, कल्पना विघे शारदा गणोरकर, शीतल राऊत, शालिनी कावरे, रोशनी गतफणे, प्रा. सुनीता अवचार, सुनिता चव्हाण, ,छाया पाथरे, अंजली वारकरी, उज्वला इंगळे, उज्वला मोरे ,धनश्री पाटील, मधुराणी बनसोड, शारदा भुयार, विमल वाघमारे, ममता राऊत ,गीता निर्वाण,इत्यादी कवयित्री भाग घेणार आहेत.
समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. शोभा रोकडे या राहणार आहेत .संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन घोंगटे व वाशिम जिल्हा अध्यक्ष प्राचार्य संजय हांडे यांनी केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






