अचलपूर तालुक्यात ३८१६ ई-रेशनकार्डचे लाभार्थीना वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अचलपूर : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अचलपूरच्या तहसील प्रशासनानेदेखील डिजिटलायझेशनची कास धरली आहे. तालुक्यात ३८१६ ई- रेशनकार्डचे वितरण झाले आहे.

तहसीलदार डॉ. संजय गरकल यांच्या पुढाकारातून, तसेच पुरवठा निरीक्षक राहुल केदारे यांच्या प्रयत्नांनी ऑनलाइन ई-रेशनकार्ड वितरित केले जात आहेत. त्यामुळे लाभार्थीना रांगेविना रेशनकार्ड मिळू लागले आहे. अचलपूर येथील तहसील कार्यालयातून आतापर्यंत ३९१६ ई-रेशनकार्ड वितरित केले आहेत. ३९१ लाभार्थीना दुय्यम ई- शिधापत्रिका, तर १७४ जणांना

दवाखान्याच्या कामासाठी ऑनलाइन ई-रेशनकार्ड, तर ८८ शुभ्र शिधापत्रिका वितरित केल्याची माहिती अचलपूर तहसीलमधून देण्यात आली.

यामध्ये १०० नवीन रेशनकार्ड अंत्योदयकरिता, २५११ नवीन रेशनकार्ड प्राधान्य योजनेकरिता, ३२३ नवीन रेशनकार्ड शेतकरी योजनेकरिता, तर ७२० नवीन रेशनकार्ड ‘एनपीएच’करिता वितरित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर २०२४ या वर्षामध्ये १५६ नावे कमी करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शासनाने रेशनकार्डमध्ये होणारा गैरव्यवहार थांबविण्यासाठी ई- रेशनकार्डची प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार अचलपूर तालुक्यात लाभार्थीना ई-रेशनकार्ड वाटप झाले.

 

शिधापत्रिकांवर हा लाभशा सनाच्या अनेक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड आवश्यक असते. शिधापत्रिका असल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय उपचाराच्या योजनेचा लाभ घेता येतो. याशिवाय बेरोजगार युवकांना ई-श्रम कार्ड काढण्यासाठीही शिधापत्रिकेची आवश्यकता असते. शुभ्र शिधापत्रिकेवर हे लाभ मिळू शकतात. नवीन लाभार्थ्यांना ऑनलाइन ई-रेशनकार्ड वितरित केले जात आहेत.

 

शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असतात. त्याची अंमलबजावणीही तेवढीच महत्त्वपूर्ण ठरते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थीना ई-रेशनकार्ड वितरित केले. त्यामुळे त्यांची संभाव्य फसवणूक टळली, शिवाय तहसील कार्यालयातील रेशनकार्डासाठीची रांगही कमी झाली. सर्वसामान्य नागरिकांची कामे प्राधान्याने आणि वेळेत व्हायला हवीत.

डॉ. संजय गरकल,तहसीलदार, अचलपूर

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013556
error: Content is protected !!