साईनगर भागातून गुटख्याची तस्करी, बोलेरोसह दोघे जेरबंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : साईनगर भागातून गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २.०६ लाख रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने ४ जानेवारी रोजी मध्यरात्री ही कारवाई केली. याप्रकरणी, सुरज हरीकिशोर लाहोटी (वय ३८ वर्षे, रा. रविनगर, अमरावती) व भूषण किशोर बूब (वय ३१ वर्षे, रा. रिंगरोड, वरूड) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूध्द राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे राजापेठ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काही इसम हे पांढऱ्या कलरच्या बोलेरो वाहनातून साईनगर मार्गाने रविनगरकडे गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, पडताळणी केली असता एमएच २७ डीएल २२९८ हे वाहन साईनगरस्थित साई हेरिटेज मालू ले आऊटजवळ आढळले. त्या वाहनाची तपासणी केली केली त्यात विविध ब्रँडचा २ लाख ५ हजार ३९६ रुपयांचा गुटखा आढळून आला. त्या गुटख्यासह १० लाख रुपये किमतीचे ते वाहनदेखील जप्त करण्यात आले. तो प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आणला, दोन्ही आरोपी तो माल कुणाला विक्री करणार होते, ती बाब चौकशीदरम्यान उघड होईल.

 

यांनी केली कारवाई

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्तत्रयी कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे व जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे, उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, फिरोज खान, सतीश देशमुख, सचिन बहाळे, अलीमउददीन खतीब, नाझिमउद्दीन सौंद, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी ही कारवाई केली. नव्या वर्षातील गुटख्याची ही पहिली कारवाई ठरली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013556
error: Content is protected !!