जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला मुख्याधिकाऱ्याकडून केराचीटोपली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंजनगाव सुर्जी :शहरातील नारिकांना सुख-सुवेधेच्या दृष्टीकोनातून शासन मोठ्या प्रमाणात निधी पुरविते.परंतु त्या निधीचा दिलेल्या नियमावलीत शहरातील नागरिकांना “उपगोग होतोय की,दुरुपयोग” याची मात्र, पडताळणी न होताच परबाह्य अहवाल सादर केले जातात अशी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. या चर्चेच्या उधानातून 35 ते 50 टक्के शासन निधीला कात्री लावण्यात अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना यश मिळत आहे.तर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनातून खर्च करण्यात येणारा शासन निधीचा गैरवापर हा स्वहित जोपासण्याचा प्रयत्न तर करीत तर नाहीत ना? यावर समाजसेवक तथा पत्रकार श्रीकांत नाथे यांनी 18 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते.त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नमूद केलेल्या मुद्यांवर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि त्याचा अहवाल सादर करण्यास मुख्याधिकारी यांना सांगण्यात आले होते.परंतु सदर निवेदनावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही मुख्याधिकारी यांनी केलेली नसून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराचीटोपली दाखवून सदर विषयी कार्यवाही तर सोडा परंतु अद्याप समाजसेवक नाथे यांच्या सोबत संवाद सुध्दा साधला नाही.त्यामुळे मुख्याधिकारी यांचे “पद मोठे पण लक्षण खोटे” असे निदर्शनात येत असून प्रशासक म्हणून खरंच नागरिकांना कितपत न्याय देत आहेत आणि एक प्रशासकीय अधिकारी या पदावर राहून स्वहित जोपासण्याचा प्रयत्न सुरू असल्याची पावती देत असल्याचे शहरात चित्र दिसत आहे.

शहराच्या विकासात्मक बाबींचा उघड्या डोळ्यांनी दिसणारा आढावा घेऊया

▪️ कोट्यवधी रुपयांच्या शासकीय भूखंडावर खाजगी व्यावसायिकाचा ताबा याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️लाखो रुपयांच्या निधी खर्च परंतु त्या महात्मा फुले मार्केटकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️जुना बस स्टॉप ते जकात नाक्याला जोडण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा उभारलेला ब्रीज याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️कोट्यवधी रुपयांमधून लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून शहरात उभारलेले खुले जिम ढासळलेल्या अवस्थेत याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️कोट्यवधी रुपयांचे पावसाळ्यात साफ-सफाई फवारणी कोठेच नाही याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️कोट्यवधी रुपयांची उलाढाल मात्र,कचरा डेपोतील कचऱ्यावर ना कुठली शात्रोक्त पद्धती ना कचरा विलगिकरणाची पद्धत याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार लक्षात घेता शहरात उघड्यावर आढळलेल्या जैविक घनकचऱ्यावर कोणतीही कार्यवाही नाही याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️करोडो रुपयांची उलाढाल घंटागाड्या नियोजनावर याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष मात्र शहारातून वाहणारी जिवंत शहानूर नदी मृत करण्यास प्रशासन सक्षम
▪️अभ्यासपूर्ण विचार न करता शासकीय जागेचा दुरुपयोग कारण खाऊगल्ली उभारून लाखो रुपये खर्च परंतु योग्य उपाययोजना करून योग्य प्रोजेक्ट उभारणीकडे करोडो रुपयाच्या जागेकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️सकाळी व दुपारच्या साफसफाई करिता कर्मचारी असतात मात्र,शहारातील सकाळची नाममात्र साफ-सफाई झाली की महिन्यातून दोन-तीनदा दुपारची साफ-सफाई सुद्धा नाममात्र(कर्मचारी ऑन ड्युटी दाखऊन निधीचा अवैध वापर) याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
▪️शहरात नाममात्र रस्ते,नाल्या,सभागृह बांधकाम निधीचा गैरवापर परंतु प्रशासनाच्या इमारती जीर्ण व पडीत अवस्थेत याकडे प्रशासाकाचे दुर्लक्ष
असे अनेक प्रश्न शहरात निर्माण झाले असून याकरिता शासनाने नगरपरिषद कार्यालयास निधी जमा करण्यापूर्वी केलेल्या कामाचा संपूर्ण तपास नियमावलीत केला की,नाही याची अहवाल खात्री करावी. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत तशी समिती नेमण्यात यावी. कारण नगरपरिषद कार्यालयाच्या या संपूर्ण कारभारावरून कल्पना मात्र शंकेची चर्चा संपूर्ण शहरात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला मुख्याधिकाऱ्याकडून केराचीटोपली
मी जनतेच्या हितपयोगी प्रश्नासंबंधित जिल्हाधिकारी यांच्या समोर थोडक्यात निवेदन पूर्ण तक्रार दाखल केले होते.परंतु त्यावर कोणतीही कारवाही करण्यात आलेली नसून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला सुद्धा संबंधित मुख्याधिकारी यांनी ठेंगा दाखवून केराचीटोपली दाखवली.परंतु नागरिकांच्या मनात उभारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण होईस्तोवर मी शांत बसणार नाही.ज्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पदभार देण्यात येतो.त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतो.मी शहारातील नागरिकांच्या हितपायोगी संबंधित प्रश्नांवर 24 जानेवारीला नगरपरिषद कार्यालय समोर उपोषणाला बसणार असून नगरविकास मंत्री यांच्याकडे समिती नेमून नागरिकांच्या हितपयोगी प्रश्नासाठी आग्रही असणार आहे. ज्यामुळे कार्यालयीन होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसेल आणि जनतेला त्यांच्या हक्काच्या प्रश्नांना न्याय मिळेल.
श्रीकांत नाथे
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता, अंजनगाव सुर्जी

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013556
error: Content is protected !!