अंजनगाव सुर्जी तहसीलदार यांनी अकराशे रोहिंग्यांना जन्म दाखले दिल्याचे किरीट सोमय्या यांचे वक्तव्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

अंजनगाव सुर्जी :महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठे वक्तव्य केले होते.ते म्हणाले होते की, मालेगावचे आयुक्त आणि तहसीलदार यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींना बनावट जन्म दाखले दिले आहेत.तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याने मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये सुद्धा रोहिंग्या मुस्लिम असल्याचे म्हटले.किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुर्जी तहसीलदार यांच्या सोबत दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी दुरध्वनी द्वारे संबंधित विषयी विचारपूस केली असता संबंधित नागरिकांचे 1484 अर्ज कार्यालयास प्राप्त झाले आहेत.त्यामधे 950 पेंडिंग अर्ज आहेत;तर मुस्लिम 485,हिंदू 84 आणि कार्यालय मार्फत वितरीत दाखले 569 असल्याचे तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी सांगितले.संबंधित विषयी अमरावती सीआयडी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात प्राचारण झाली असून तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या हे काही काळातच अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत रोहींग्या
पाकिस्तान, साउदी अरब, थायलंड तसेच म्यानमारच्या राखीन राज्य आणि बांगलादेशच्या चितगाव प्रदेशात राहणारे राज्यहीन लोकांना रोहिंग्या म्हटले जाते.रोहिंग्या लोक सामान्यतः मुस्लिम आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013556
error: Content is protected !!