अंजनगाव सुर्जीत वास्तव्यास बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम – किरीट सोमय्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

किरीट सोमय्या यांचा 12 व 13 तारखेला अंजनगाव सुर्जी दौरा

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा 12 व 13 जानेवारीला अंजनगाव सुर्जी येथे दौरा असल्याची माहिती अंजनगाव सुर्जी भाजप शहराध्यक्ष उमेश भोंडे यांनी दिली. भाजप नेते सोमय्या हे शिर्डी वरून अंजनगाव सुर्जी येथे प्रस्थान करणार आहेत. तर 12 तारखेला अंजनगाव सुर्जी येथे मुक्कामी असणार आहेत आणि 13 तारखेला सकाळी 10 वाजता अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या सोबत चर्चा करून दुपार नंतर अमरावती कडे प्रस्थान करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष उमेश भोंडे यांनी दिली आहे.

अंजनगावात 1100 बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम
1100 बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम अंजनगाव सुर्जीत वास्तव्यास असल्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकताच गौप्यस्फोट माध्यमांसमोर केल्याने अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय येथे सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रकरणी अमरावती जिल्हा समवेत अंजनगाव सुर्जी शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर अंजनगाव सुर्जी शहरात बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम वास्तव्यास असल्याप्रकरणी 13 तारखेला तहसीलदार पुष्पा सोळंके यांचा सामना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी होणार आहे.

मी कुठलाही चुकीचा आदेश दिला नाही
अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी माध्यमांसमोर सांगितले की, मला 8 तारखेला भाजप नेते किरीट सोमय्या यांचा फोन आला.त्यांनी मला विचारले की, मालेगाव येथे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम वास्तव्यास आढल्याचा प्रकार अंजनगाव सुर्जी हद्दीत आहे का? अशी विचारणा केली असता असा कुठलाही प्रकार अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालय अंतर्गत झाला नसल्याचा तहसीलदार यांनी सोमय्या यांना म्हटले. अंजनगाव सुर्जी तहसील कार्यसिमेत 1100 बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम वास्तव्यास असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितलेला आकडा चुकीचा आहे. आम्ही अर्जदारांचे संपूर्ण कागदपत्र पडताळणी करूनच अर्जदार यांना प्रमाणपत्र देतो आणि मी कार्यालय अंतर्गत कुठलाही गैरप्रकार केलेला नसून कोणताही चुकीचा आदेश दिला नाही.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013556
error: Content is protected !!