
खरपी (शेतशिवाराती घटना)
परतवाडा प्रतिनिधी : चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगांव कस्बा पोलीस स्टेशन हद्दीतील खरपी शेतशिवारातील एका झोपडीत महिला मृत अवस्थेत असल्याची माहिती होताच सर्वत्र खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार महेंद्र गवई, पोलिसांचा ताफा घटना स्थळी दाखल झाला असता रक्त बंबाळ अवस्थेत मृत झालेली महिला दिसून आली.
पोलिसांनी तत्काळ तपास केला असता मृत महिलेची ओळख सुनंदा लखन ठाकरे (५०) मध्यप्रदेश अशी पटली. या महिलेच्या डोक्यावर काठीने वार केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. शिरजगांव येथील सेवानिवृत्त एमएसईबी अभियंता पाटेकर यांच्या शेतातील खोपडीत ही महिला मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तपासाकरीता श्वान पथक घटनास्थळी बोलवून घेतले होते.
सकाळी हत्येची घटना होताच अवघ्या काही तासातच आरोपी सुनिल मरकाम मध्यप्रदेश याला ताब्यात घेतले असता मृत महिला आरोपी गेल्या काही वर्षापासुन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सहमतीने राहत होती. कुठल्यातरी कारणामुळे बाद होवून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी मध्यप्रदेश निवासी आरोपी सुनिल मरकाम ला ताब्यात घेत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास शिरजगांव पोलिस करत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






