शहरात डिस्पोजेबल कप आणि चायना मांजा विक्रीवर बंदी करा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

▪️तहसीलदार यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी : शहरात डिस्पोजेबल कप आणि चायना मांजा विक्रीवर बंदी लागू करण्यात यावी यासाठी 10 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
अंजनगाव सुर्जी शहरात एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे. प्लास्टिकचे ग्लास आरोग्यासाठी धोकादायक मानून आपण सर्वांनी पेपर कपमध्ये चहा प्यायला सुरुवात केली आहे. पण सत्य हे आहे की, डिस्पोजेबल पेपर कपमध्ये चहा पिणे सुद्धा तितकेच धोकादायक आहे. कागदी कपाच्या आतील आवरणात पातळ प्लास्टिक आवरणाचे विघटन होऊन त्याचे कण चहात विरघळून मानवी आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळे मानवाला कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. जेव्हा आपण चहा किंवा कॉफी डिस्पोजेबल पेपर कपमध्ये पितो. तेव्हा 75,000 सूक्ष्म प्लास्टिकचे कण गिळतो. असे प्रख्यात खरगपूर IIT शास्त्रज्ञांनी उघड केले आहे.
तसेच मकरसंक्रांत सण आल्याने चायना मांजा विक्री मोठ्या प्रमाणत असून कित्येक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. ज्यामधे चायना मांजा द्वारे कुणाचा गळा चिरून मृत्यू होतो तर काही मोठ्या प्रमाणात जखमी होतात. अश्या मानवी जीवनास धोका उद्भवणाऱ्या वस्तूंवर बंदी घालून माल जप्त करण्यात यावा आणि कारवाही करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रसिद्धी प्रमुख संतोष गोलाईत यांनी म्हटले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013554
error: Content is protected !!