
प्रतिनिधी श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी :कोट्यवधी रुपये खर्च करून अंजनगाव व सुर्जी या जुळ्या शहराला जोडणारा शहानूर नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने नागरिकांची चिंता वाढविणारा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून खर्च करण्यात आलेला निधीपूर्ण पुलाचे काम मात्र; अर्धवट असल्याने वहिवाट करणाऱ्यांची मात्र हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगरपरिषद कार्यालयाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन वर्षापासून त्या पुलाचे काम अर्धवट आहे. मुख्यतः अंजनगाव मधून सुर्जीमध्ये प्रवेश करतांना उजव्या बाजूला नगरपरिषद कार्यालयाची जागा आहे. तर दुसऱ्या बाजूला सती माता मंदिर स्थित असून मंदिर परिसरातूनच शहरातील डांबरीकरणाला पुल जोडला गेल्याने भविष्यात मात्र; मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुर्जी मधून अंजनगाव मध्ये प्रवेश करतांना तीच परिस्थिती असून पुलाच्या दोन्ही कडेच्या रोडला जोडलेल्या बाजू यावर कुठले काँक्रीटकरण नाही ना डांबरीकरण नाही. अपघाताच्या भीती पोटी पुलाचा निधी कुठी? प्रशासनाच्या अनियोजकतेमुळे पुलाचे काम अर्धवट? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
त्यामुळे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून शहानूर नदीवर उभारण्यात आलेला करोडो रुपयांचा सबमर्सिबल पुल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून अपूर्ण पुलाच्या कामामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. प्रशासन नागरिकांना अर्धवट सुविधांची पूर्तता दाखवून मलिदा लाटून मुंग गिळून गप्प असलेले अर्धवटरावांचा तपास शासनाने करावा अशी चर्चा शहरात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






