
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाला सध्या भंगार बसेसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. गत चार वर्षात ३७ बस भंगारात काढाव्या लागल्या. आता येत्या मार्च महिन्यात आणखीन ३४ बस भंगारात जाणार आहेत.
चार वर्षांपूर्वी अमरावती विभागात एसटी महामंडळाच्या ताफ्यात ४६५ बस होत्या. त्यापैकी आतापर्यंत १४९ बसेस भंगारात निघाल्या आहेत. एकीकडे एसटी बसची संख्या घटली असताना, केवळ दीड वर्षात २० नवीन बस मिळाल्या आहेत. अनेक बसेसही जुन्या झाल्यामुळे भंगार बसमधून प्रवाशांना जावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात ३१६ बस उरल्या आहेत. त्यामुळे अमरावती विभागाला २७१ नवीन बसचा पुरवठा करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
लांब पल्ल्यासाठी बसचा तुटवडा?पूणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा देण्यात अडचणी येत आहेत. पाच लाख किमीच्या आतील प्रवास दिलेल्या बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरण्यात येतात. त्यानंतरच या बस कमी पल्ल्यासाठी वापरण्यात येतात. सध्या लांब पल्ल्यासाठी बस कमी पडत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






