![]()
आज दो- दाणी : गोविंदा-मिसाइल, मयूर-हरण्याची एंट्री; बच्चू-गणपती, बादशाह-शहंशहा, गीतांजली-गोल्डन, कालीचरण-कृष्णा सज्ज
तळेगाव दशासर : तळेगावच्या जगप्रसिद्ध शंकरपटात पहिल्या दिवशी दो-दाणी पटावर धावण्यासाठी २० पेक्षा अधिक शंकरपटांची बक्षिसे पटकविणाऱ्या आणि समाजमाध्यमावर प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील हिंदकेसरी गोविंदा-मिसाईल व मयूर-हरण्या या बैलजोड्यांची एन्ट्री झाली आहे.
बच्चू-गणपती, बादशाह-शहंशाह, लेंपी-गीतांजली, गोल्डन-कालीचरण, कृष्णा-जयराम, तेजा-सजणा, भवऱ्या- बुलेट, राणा-धनुष्य, लाल बादशाह-सरकार, दुश्मन-पिस्टन, किस्मत-राणा, बजरंग-वीर अशा विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मराठवाडा येथील तब्बल २७४ बैलजोड्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
२५ फूट अंतर धावतेय जोडी जोडी धावण्याचे अंतर ४५० फूट आकारण्यात येते. जोडी धावण्याला सुरुवात करेल त्या ठिकाणी लांब धागा बांधला जातो. शेवटच्या टोकाला दुसरा आडवा धागा बांधला जातो. झेंडी दाखवून पटाला सुरुवात होताच, जोडीने पहिला धागा तोडताच घड्याळावर वेळेची नोंद होते व पटाचे अंतर पार करताच दुसरा धागा तुटतो. त्याचीही नोंद घड्याळात होते. कोणती बैलजोडी किती वेळात धावली याची नोंद होते.
शंकरपट व यात्रा महोत्सवाचे वैशिष्ट्य शेतकरी वर्षभर आपल्या जनावरांसाठी लागणारी लाखो रुपयांचे शेती अवजारे, साहित्य खरेदी येथे करतात. लाखो रुपयांची उलाढाल येथे होते.
पटात पूर्वीपासून बैलजोडी हाकण्यासाठी पुराणी (आरू) व काठीचा वापर होत नाही. प्राणिमात्रावर दया दाखविणारा हा शंकरपट आहे.
या यात्रा महोत्सवात तीन दिवस अफाट गर्दी असते
• येथील चिवडा महाराष्ट्रात प्रसिद्ध ४ आहे
● आपल्या बैलांच्या खुरी येथे दुरुस्त करण्यात येतात.
● विदर्भात सर्वाधिक उत्कृष्ट दर्जाचे लाकडी साहित्य या पटात पाहायला मिळते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






