
धामणगाव रेल्वे : दिवसेंदिवस गावरान वाणाला अधिकाधिक मागणी वाढली आहे. पण, काळाच्या ओघात गावरान आवळा, बोरांसह इतरही फळे कालबाह्य होत असल्याचे चित्र आहे. आता बहुतांश संकरित वाणांनीच बाजारपेठ फुल्ल होत आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. हे फक्त एक आंबट फळ नसून, पोषक तत्त्वांचा खजिना आहे. आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत.
आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन होऊ शकते. तुम्हाला हवे असल्यास तो कच्चा खाऊ शकता किंवा मुरांबा, लोणचे, ज्यूस बनवून सेवन करू शकता. जास्तीत जास्त फायदे हवे असल्यास कच्चा आवळा खाणे योग्य असल्याचे निसर्गोपचार तज्ज्ञांनी सांगितले.
लोणचे, कँडी, मुरब्ब्याने बरण्या भरणार!आवळा हा शरीरासाठी चांगला असल्याने लोक आता आवळ्याचे लोणचे, कॅण्डी अन मुरब्बा तयार करू लागले आहेत. याशिवाय बाजारात आता आवळ्याची पावडर, आवळा कँडी, आवळा मुरब्बा, आवळा पावडर, च्यवनप्राशचा मूळ बेस असे विविध पदार्थ बनवून अनेक दिवस घरात ठेवून ते रात्री सेवन करतात. आवळ्यापासून विविध प्रकारची खाद्दपदार्थही गृहीणींकडून आवडीने केली जातात.
केस, त्वचा चमकते; पचनशक्ती सुधारते आवळा वात, पित्त अन् कफ नष्ट करते, पोट साफ होते, पचनक्रिया सुधारते, थॉयराइड नियंत्रणात येते. डायबिटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा उत्तम असून, केस गळती थांबविण्यास मदत, वजन कमी करण्यास उपयुक्त, दृष्टी सुधारते, मोतिबिंदूचा धोका कमी होतो तसेच शरीराची प्रतिकार शक्ती सुधारते.
गावरान आवळाही सर्वत्र उपलब्ध ग्रामीण भागातील बाजारात गावरान आवळा सहज मिळतो तसेच आता शहरातील विविध भाजीपाला मार्केटमध्ये आवळा विक्रीला आला आहे. अमरावती भाजी बाजार परिसरात ७० ते ९० रुपये किलोप्रमाणे आवळ्याची विक्री होत आहे.
गृहउद्योग, महिला गटांकडून खरेदी कोरोनापासून हर एक वस्तू दारावर विक्रीस उपलब्ध असते. याशिवाय आता महिला बचत गटांच्या महिलासुद्धा विविध वस्तूंची विक्री करू लागल्या आहेत. बहुतांश लोक महिला बचत गटांच्या माध्यमातून आवळ्याची खरेदी करतात.
आवळ्याचे शरीरासाठी फायदे आहेत. भारतीय संस्कृतीनुसार वर्षातून एकदा कार्तिक पौणिमेला आवळा भोजन म्हणजे आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज आवळा किंवा आवळ्याचे बनवलेले पदार्थ खाणे फायदेशीर आहे.
– डॉ. अशोक भय्या, धामणगाव रेल्वे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






