शॉटसर्किटमुळे शेतकऱ्याचा कापूस जळून खाक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी : शहरातील माळीपुरा स्थित शेतकऱ्याच्या घरातील कापसाच्या गंजीला आग लागल्याने 10-15 क्विंटल कापूस जळून नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अंजनगाव सुर्जी शहरातील माळीपुरा येथील शेतकरी गजानन सुभाषराव भुस्कट यांच्या घरातील कापसाच्या गंजीला आग लागल्याची घटना दि.15 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली. हातातोंडाशी आलेला घास एकाएकी आगीच्या भक्ष्यस्थानी बघून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. धुराचे लोट पाहून शेजाऱ्यांनी आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तर ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून घटनेसंबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013553
error: Content is protected !!