शासन पाठीशी मग भिती कुणाची;भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बोलबाला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी :वसुंधरा पुरस्कार प्राप्त अंजनगाव सुर्जी नगरपरिषद पुरस्काराचा जवळपास पन्नास लाखाचा बहुमान गिळण्यास आ… करून आहे. हा पुरस्कार मिळण्यासाठी धडपडलेल्या संघटनांनी आपले बहुमोल योगदान देत नगराची लाज बाळगली. एव्हढच नव्हे तर तो बहुमान निधी मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. मात्र, नगरपरिषद प्रशासन वसुंधरा स्वच्छतेसंबंधित शहरात स्वच्छता मोहिमेचा गवगवा करीत त्या तुलनेत सध्या मात्र; स्थानिक प्रशासन शहराला निरोगी आरोग्यावर उपाय करण्याऐवजी अपाय ठरत असल्याची चर्चा शहरात आहे.
शहरातून प्रवाहित असणारी शहानूर नदी असो की शहारा लागूनच असलेला कचरा डेपो. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक प्रश्नांची व परिसरातील अस्वच्छतेबाबतीत ओरड नागरिकांमध्ये असली तरी स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत निधी पूरक कागद काळे करून नागरिकांना रोगी करण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शासनाने “स्वच्छ भारत अभियान”, “स्वच्छ शहर ; सुंदर शहर”, “वसुंधरा पुरस्कार” असे पुरस्कार देण्यापूर्वी लाईव्ह कार्यालयीन कामकाज तपासून अंती शासन निधी जमा करायला हवा अशी ओरड आरोग्यप्रेमींमध्ये आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013553
error: Content is protected !!