प्रधानमंत्री आवस योजनेतील लाभार्थी वंचित

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवस योजनेअंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येतात. मात्र, शहरातील प्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना शेवटचा 30 हजाराचा टप्पा न मिळाल्यामुळे लाभार्थ्यामध्ये सरकार विषयी नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यामुळे लोकसभेत, विधानसभेत घडलेल्या परिस्थितीनिशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुद्धा “अग् अग् म्हशी मला कुठे नेशी” या म्हणीगत आपली चूक दुसऱ्याच्या माथ्यावर मारण्यासारखी परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
येत्या काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अश्यातच सरकारच्या अधिपत्याखाली चालत असलेली कार्यालयीन व्यवस्था ही संथगतीने व भोंगळ कारभारामुळे चर्चेला उधाण आणत आहे. यातच भर पडत आहे ती म्हणजे 2019-20 मधील प्रधानमंत्री आवस योजनेच्या लाभार्थ्यांना शेवटचा टप्पा न मिळाल्याची व पक्षांतर्गत फुटीच्या राजकारणाची. प्रधानमंत्री आवस योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यालयीन ये-जा करून दमछाक पाहायला मिळत असल्याने त्याचे पडसाद येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरकार मधील स्थानिक नेत्यांना दुष्परिणाम पदरी पडणार का? असे प्रश्नांकित चर्चेतून अंजनगाव सुर्जी शहरात संकेत वर्तविले जात आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013553
error: Content is protected !!