
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
येथील प्रभाग क्रमांक ३ मधील मातंगपुरा, येथे काही दिवसांपूर्वी साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे यांच्या नावाने नगर परिषदेच्या खुल्या जागेवर शहर मार्गासवर्गीय निधीतून सौंदर्यीकरणा साठी २४ लक्ष रुपये मंजूर झाले आहे. परंतु मातंग बांधवांचे म्हणणे आहे की, या जागेवर आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला, हा आम्हाला मान्य नाही. या जागेवर साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह बांधण्यात यावे, या साठी मातंग बांधवांचे दोन दिवसा पासून उपोषणाला बसले आहे. अंजनगाव शहरांमध्ये मातंग समाजाची लोकसंख्या भरपूर प्रमाणात आहे. परंतु एकही मोठे सभागृह मातंग समाजाच्या दृष्टीने नाही .आम्ही लग्नकार्य वाढदिवस आणि इतर कार्यक्रम कुठे करायचे, हा मोठा प्रश्न पडलाय असे आमच्या प्रतिनिधी बोलताना उपोषणकर्त्यांनी सांगितले. जोपर्यंत या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे सभागृह होत नाही. तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, असे मत यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले. उपोषणाला दोन दिवस होऊन गेले असून सुद्धा नगरपरिषदेच्या कोणतेही अधिकाऱ्यांनी भेट सुध्दा दिली नाही. असे उपोषणकर्त्यांनी सांगितले, आता याकडे लक्ष लागले आहे की, मुख्याधिकारी हे सभागृह करतात कि नाही याकडे मातंग बांधवांचे लक्ष लागले आहे.
उपोषणकर्त्यांनी सांगितले की, आमदार व खासदार दोन्हीही मागासवर्गीय असल्यामुळे या सभागृहाकडे लक्ष द्यावे .आणि साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह करावे,अशी उपोषणकर्त्याची मागणी आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






