
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलिम्पिकविर कांस्य पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांची जयंती राज्य सरकारचे वतीने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणे बाबत आदेशित केले आहे याचा महत्वाचा उद्देश म्हणजे शाळकरी मुले मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावेत व निरोगी राहावेत त्याच अनुषंगाने पंचफुलाबाई हरणे विद्यालय अंजनगाव येथे १५ जानेवारी बुधवार रोजी राज्य क्रीडा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले सर्वप्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जे.एस. कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. खाशाबा जाधव यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लंगडी, दोरीवरच्या उड्या, रस्सीखेच, धावण्याची शर्यत अश्या विविध देशी खेळांचे आयोजन क्रीडा शिक्षक प्रमोद मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढून मेडल तसेच प्रशस्ती पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






