
सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
विविध प्रकारच्या कागदपत्रे काढून देण्याच्या नावाखाली अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालय परिसरात दलालांकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात होती. या दलालांचा प्रकार अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आल्यावर अनेक वेळा दलालांना तहसील कार्यालयातुन तंबी देऊन बाहेर काढण्यात आले होते.
या बाबत माहिती अशी की, बांगलादेशी नागरिकांना तारखेचे प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरू होताच वेगवेगळ्या कामाकरिता सक्रिय असलेले दलाल गेल्या काही दिवस तहसील कार्यालयाकडे फिरकले सुद्धा नाही. मात्र किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील प्रकाराबद्दल बांगलादेशी रोहिंग्याच्या जन्म दाखल्यावरुन आरोप केला होता. त्या आधारावर शासनाने एस आईटी नेमुन चौकशी करण्याचे आदेश दिले तर जिल्हा प्रशासनाने गुरवारी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठीत केली. त्यामुळे तहसिल कार्यालयात दररोज वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व पोलीस चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात येत असल्याने कार्यालयाच्या परिसरातील दलाल चार ते पाच दिवसांपासून पोलीस चौकशीला ताब्यात घेतील या भितीपोटी भुमिगत झाले असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तहसिल कार्यालयात ग्रामीण भागातील व शहरातील कामानिमित्त येत असलेले नागरिक दलालांचा शोध घेत असताना काही दलालांचा मोबाईल बंद असल्याची चर्चा होती. दलाल कार्यालयाच्या परिसरात दिसत नसल्यामुळे महत्वाचे कागदपत्रे काढणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. एक दलाल आठ ते दहा नागरिकांच्या संबंधित असलेल्या योजनांचे कागदपत्रे काढून देण्याचे काम करतो. आता दलाल नसल्यामुळे नागरिकांना कागदपत्रे स्वतःला काढावे लागत असल्यामुळे शहरातील महत्वाच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. दलालांची होऊ शकते चौकशी बांगलादेशी व रोहिंग्याच्या जन्म दाखला नोंद अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात झाली असल्याची तक्रारीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून या चौकशी द्वारे शासकीय कार्यालयात काम करणारे दलालांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील दलाल हे अनेक प्रकारचे दाखले बनावट प्रकारचे तयार करून देत असल्याची चर्चा होत आहे. शाळा सोडण्याचा दाखल, राशन कार्ड, आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र सारखे महत्वाचे कागदपत्रे बनावट प्रकारचे दलाल करुन देत असल्याची बरेच दिवसांपासून चर्चा आहे. या होणार्या चौकशी मुळे बनावट प्रकारचे कागदपत्रे तयार करणारी दलालांची टोळी गजाआड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






