Manora: पोहरादेवी येथे उज्वल गजभार यांचा सत्कार!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उपविजेता गाजभार यांनी घेतले देवी देवतांचे दर्शन…

मानोरा : नुकताच मुंबई येथे पार पडलेल्या झी टिव्ही शो सा रे गा मा पा  उपविजेता म्हणून निवड झालेल्या उज्वल गजभार  यांनी प्रथमच पोहरादेवी येथे दर्शन घेतले. यावेळेस त्याचा ठीकठिकाणी सत्कार झाला.

धर्मगुरू कबिरदास महाराज यांनी जगदंबा माता व संत सेवालाल महाराज संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ देवून उज्वल गजभार यांच सत्कार केला. संत रामराव बापू आश्रम येथे धर्मगुरू आमदार बाबुसिंग महाराज  यांचे चिरंजीव भक्तराज महाराज व धीरजराज महाराज यांनी पुष्गुच्छ देवून सन्मान केला. तसेच संत बानलाल महाराज संस्थान येथे देवीचे दर्शन व संत बाबणलाल महाराज यांचे दर्शन घेतले. संतोस महाराज, अजय महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर धर्मपीठ भक्तिधाम येथे दर्शन घेवून धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचा आशीर्वाद घेतला. महाराजांनी शाल श्रीफळ देवून धर्मपीठ भक्तिधामच्या वतीने सन्मान केला. यावेळेस पोहरादेवी येथील युवक वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013552
error: Content is protected !!