
मोर्शी : वरूडकडे जात असलेल्या तवेरा गाडीला सोमवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भाईपूर फाट्यावर वराह आडवा आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे, तर १४ जण जखमी झाले आहेत.
खरपी येथील कुटुंब कार्यक्रमानिमित्त तवेरा गाडी (क्रमांक एमएच १२ एफझेड ११९६) ने वरूडकडे जात होते. अशातच भाईपूर फाट्यावर अचानक वराह आडवा आल्याने वाहन उलटून अपघात घडला. या अपघातात साजीया बानो अक्रम अली (४०, रा. खरपी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींमध्ये अलिशा फतेमा (९), आयेषा फातिमा (१०), जेहान अली (१२), मोसीम खान (३४), इलायत अली (४०), शिजा फातिमा (१४), अत्तहर खान (१३), शहिदा बानो (५०), जहेर असलम अली (५), फराह अंजुमन असलम अली (३०), अलीजा फतेह (७), आरजू फत्तेमा (४), बीबी नाज (३०) आदी गंभीर जखमी झाले आहेत.
मदतीला धावले गावकरी सदर अपघाताची घटना घडतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींवर औषध उपचार केल्यानंतर सर्व जखमींना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






