
अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान शुक्रवारी पोलिसांना उद्देशून अश्लील शब्द उच्चारण व पोलिस दलाबाबत अप्रीतीची भावना चेतविल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांना गुन्हा दाखल केला.
गाडगेनगर ठाण्यात कार्यरत व आंदोलनस्थळी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मेश्राम यांनी याबाबत २६ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. सबब, राजू मारोतराव वानखडे (५०, रा. धामणगाव काटपूर, ता. मोर्शी) विरुद्ध सार्वजनिक स्थळी अश्लील कृती व पोलिस अधिनियमातील सहकलम ३ (१) पोलिसांप्रति अप्रीतीची भावना चेतवणे या कलमांन्वये गुन्हा नोंदविला. पंचवटीहून होणारी अवैध प्रवासी वाहतूक व गाडगेबाबा ट्रॅव्हल्स बंद करावी, यासाठी आझाद समाज पार्टीचे अक्षय पांडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
काय झाले नेमके ? एफआयआरनुसार, आरटीओत २४ जानेवारी रोजी दुपारी २० ते २५ आंदोलक हजर होते. त्यावेळी राजू वानखड पोलिसांना उद्देशून सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द उच्चारले. पोलिस दलाबाबत अप्रीतीची भावना चेतविली. त्यास समजदेखील देण्यात आली.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल दरम्यान आरटीओ कार्यालयाबाहेरील त्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ती बाब पोलिसांपर्यंतदेखील पोहोचली. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजात पोलिसांप्रति चुकीची भावना पसरत आहे, त्यामुळे राजू वानखडेविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी पोहेकॉ. मेश्राम यांनी तक्रार नोंदविली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






