
अमरावती : एका अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. या प्रकारची वाच्यता न करण्यासाठी तिला धमकीसुद्धा देण्यात आली. ही घटना २५ जानेवारी रोजी मोर्शी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मोहित अविनाश बुरांगे (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहितने पीडित १७ वर्षीय मुलीला जंगलात नेले. तेथे त्याने तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास तुला जंगलातच सोडून देईल, अशी धमकी मोहितने पीडित मुलीला दिली. या प्रकरणी पीडित मुलीने मोर्शी ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी मोहितविरुद्ध गुन्हा नोंदविला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 154






