
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्काय वॉकच्या कामाला सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवारी पाचशे मीटर लांबीची पहिली केबल ओढली गेली,अशा एकूण १४ केबल ओढल्या जाणार आहेत. अनेक अडथळे पार करीत हा स्कायवॉक पूर्ण होत आहे.भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगन भरारी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्काय वॉकने जोडण्यात येत आहे. स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असेल. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 154






