अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने उच्चसमिती नेमून ऑडिटला दिली हिरवी झंडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

▪️अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेवर होणार उच्चसमिती समिती गठित

अंजनगाव सुर्जी :नगरपरिषदेसमोरील उपोषणकर्ते समाजसेवक श्रीकांत नाथे यांच्या मागणीला अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने हिरवी झंडी दिली. वरिष्ठांसोबत संबंधित उपोषण मागणी विषयी तहसीलदार पुष्पा सोळंके (दाभेराव) यांच्या मध्यस्थीने शहरातील नागरिकांच्या हितोपयोगी मागणीचे गांभीर्य लक्षात घेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला समाजसेवक श्रीकांत नाथे यांचे उपोषण सोडविले.

 

 

अंजनगाव सुर्जी नगरपरिषद अंतर्गत प्रशासकीय काळातील शहरात करण्यात आलेल्या जनतेच्या विकासात्मक आणि आरोग्यदायी विषयक शासन निधीच्या तुलनेत कामकाज न झाल्याने शहरातील विकासात्मक आणि आरोग्यदायी कामकाज संदर्भात उच्च समिती नेमून ऑडिट करावे या मागणी करिता समाजसेवक श्रीकांत नाथे यांनी अंजनगाव नगरपरिषद समोर 23 तारखेला आमरण उपोषणास सुरुवात केली होती. उपोषण मागणीचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार पुष्पा सोळंके दाभेराव यांनी मध्यस्थी करून वरिष्ठांसोबत मागणी विषयी चर्चा केली असता त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांनी मागणीला हिरवी झेंडी देत अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेवर समिती नेमून ऑडिट करण्याला हिरवी झेंडी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रजासत्ताक दिनाचा मान राखत तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी मागणी संदर्भात लेखी पत्र देऊन समाजसेवक श्रीकांत नाथे यांचे उपोषण सोडविले.
यासंदर्भात संपूर्ण शहरात चर्चेचे उधान आले असून अंजनगाव सुर्जी नगरपरिषद कार्यालयमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता शासनाची उच्चसमिती नेमके काय करणार? जनतेच्या हिताच्या प्रश्नांची उच्चसमिती गांभीर्याने तपासणी करणार का? जनतेच्या हिताच्या मागणीला न्याय देणार का? याकडे अंजनगाव सुर्जी शहरातील सर्व जनतेचे लक्ष वेधले आहे.

 

———————————————————————————————————————————————-
शहरातील नागरिकांच्या न्याय व हक्क संदर्भात निर्माण होत असलेल्या वाढत्या तक्रारी तसेच नगरपरिषद विषयी नागरिकांची होत असलेली ओरड त्यामुळे मला व्यक्ती स्वातंत्र्याचा मिळालेल्या हक्काच्यानुसार उपोषणाचे पाऊल उचलावे लागले. शासन नक्कीच अंजनगाव सुर्जी शहरातील नागरिकांच्या हितपयोगी व माझ्या रास्त मागणीला न्याय देईल अशी मला शाश्वती आहे.
श्रीकांत नाथे
समाजसेवक अंजनगाव सुर्जी

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013552
error: Content is protected !!