अवैध सावकारांकडे धाड दोघांकडून कागदपत्रे जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

सामरानगर, हरिओम कॉलनीत ‘सहकार’ विभागाची कारवाई

 

अमरावती : शहरातील सामरानगर व याच परिसरातील हरिओम कॉलनी येथे अवैध सावकारी करणाऱ्या दोन सावकारांच्या घरी सहकार विभाग पोलिसाच्या पथकाने गुरुवारी (दि. ३०) धाडी टाकल्या. या प्रकरणी सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार सहकार विभागाचे दोन पथकांनी अवैध सावकार मुकुंद काशीराव पुसदकर (विजयानंद अपार्टमेंट, सामरानगर) व प्रकाश काशीनराव पुसदकर (हरिओम कॉलनी, जुना बायपास रोड) यांच्या घरी धाड टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत.

सामरानगर येथे कथित अवैध सावकारी व्यवसायांतर्गत दोन भाऊ अवैधरीत्या सावकारी करीत असल्याची तक्रार सहकार विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने दोन पथकांची नियुक्ती केली. या दोन पथकाने गुरुवारी (दि. ३०) सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास सामरानगर येथील सावकारांच्या घरी धाड टाकली. या धाडीत संबंधित अवैध सावकार यांच्या घरातून सहकार विभागाचे पथकाने कोरे स्टॅम्प पेपर, इसार चिठ्ठी, स्थावर मालमत्ता खरेदी खत, स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश, उसनवार रक्कम दिल्याची पावती, असे एकूण १९ दस्तऐवज सहकार विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत, तर दुसऱ्या कारवाईत हरिओम कॉलनीतील दुपारी १.२५ वाजता टाकलेल्या धाडीत सहकार विभागाच्या पथकाने अवैध सावकाराच्या घरातून दोन खरेदी खताचे दस्तऐवज जप्त केले आहे.

सकाळी वाजेपासून १०.४५ सहकार विभागाच्या दोन पथकांनी सुरू केलेली कारवाई दुपारी ३.३० वाजता पूर्ण करण्यात आली आहे. ही कारवाई पथक क्रमांक १ चे प्रमुख म्हणून सहकार विभागाच्या अधिकारी आशिष चर्जन, अझहर खान, संख्या बदारिया, नंदकिशोर जवंजाळ, पंच अश्विनी शेंडे, रोशन सांभारे, पोलिस कर्मचारी इकबाल खान, कोकिळा राऊत यांनी हरिओम कॉलनीत तर पथक क्र. २ प्रमुख किशोर बलिंगे, अमोल नालट, सुस्मिता सुपले, वसंत शेळके, रमण धोत्रे, शिवम साखरकर, पोलिस कर्मचारी सतीश टपके व कल्पना तोटे आदींनी सामरानगर येथे कारवाई केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!