
जिल्हाधिकारी सौरभ कटियार : क्रीडा महोत्सवाला थाटात झाला प्रारंभ
अमरावती : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खूप नैपुण्य व कलाकृती आहे. जिल्हा परिषदेचे कार्यक्रम हे दर्जेदार असतात व उत्साह असतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे केले. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा महोत्सवाला प्रारंभगुरुवार ३० जानेवारी झाला. याप्रसंगी उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी कटियार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र ह्या होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात भक्तीगीत, भावगीत, लोकगीत सिनेगीत, हास्यजत्रा, समूहनृत्य, कराओके एकल नृत्याचा समावेश होता.
महोत्सवामुळे नवचैतन्य निर्माण होतेः महापात्र दैनंदिन कामाचा ताणतणाव कमी व्हावा, याकरिता दरवर्षी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतो. जिप अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खूप सुप्त गुण असतात. यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव हे एक व्यासपीठ आहे. यामुळे नवचैतन्य निर्माण होते, असे सीईओ संजीता महापात्र यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






